‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’
अशी हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे फलटणच्या एका महिला डॉ. संपदा मुंडे यांनी दोन पोलीस अधिकाऱ्याकडून शारीरिक छळ, चार वेळा शारीरिक अत्याचार अन कुटुंबाचे गंभीर आरोप या सगळ्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण चला पाहूयात
नमस्कार मी कुणाल आणि आपण पाहत आहोत अजिंक्य नगरीचे youtube चायनल
मुळची बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगी शिकली डॉक्टर झाली आणि पहिलीच पोस्टिंग मिळाली सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती मिळाली ती जीद्दी आणि शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणजे डॉ. संपदा मुंडे
डॉ. संपदा मुंडे यांनी फलटण येथीलच एका हॉटेल मध्ये आत्महत्या केली आणि हातावर सुसाईट नोट लिहून ठेवली उच्च सुशिक्षित तरुण मुलगी आत्महत्या करते आणि यात नाव येथे पोलीस अधिकाऱ्यांचे
फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबाने राजकीय दबावामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा इशारा दिला आहे.
संपदाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. यासोबतच तिने मृत्यूपूर्वी तिची सुसाईड नोट लिहिली होती. यात तिने पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस नाईक प्रशांत बनकर या दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आता याप्रकरणी मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून मोठा विलंब आणि अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. या घटनेनंतर चार ते पाच तास उलटून गेले आहेत. तरी कोणतीही मोठी कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच शवविच्छेदनाबद्दल पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा हालचाल दिसत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत डॉक्टरांनी केलेल्या एका कथित अर्जात एका खासदाराच्या पीएचा उल्लेख आहे. हा पीए फोनवरून बोलताना अनेकदा खासदार बोलत असल्याचे सांगायचा. तसेच रिपोर्ट बदलण्याबाबत दबाव टाकत असे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण राजकीय दबावाखाली असल्याचे आरोप कुटुंबाकडून केला जात आहे.
इथे काहीतरी नक्कीच राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. कारण तिथे आम्हाला एफआयआर दाखल करुन येण्यास ४ ते पाच तास लागले. आता या पोस्टमोर्टमसाठी तीन ते साडेतीन तास उलटून गेलेत तरी कोणी डॉक्टर पोस्टमोर्टमसाठी आलेले नाहीत. तिने आम्हाला जे काही अर्ज दिले होते. त्यात खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख आहे, असे तिच्या कुटुंबाने सांगितले.
खासदारांच्या पीएंच्या फोनवर फोन करुन खासदार बोलले आणि आमच्यावर चुकीचे रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव टाकला.
दरम्यान या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे लागेबांधे, पोलीस अधिकाऱ्यांची कथित भूमिका आणि तपासात होणारा विलंब पाहता, प्रशासनावर तातडीने कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे. मृत डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
कायद्याचे राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जर अशी परिस्थिती असेल एखाद्या महिला डॉ. ला आत्महत्या करावी लागत असेल आणि यात आरोपी चक्क पोलीस आणि एखादा राजकीय नेता असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय हा गंभीर सवाल आम्ही उपस्थित करत आहोत