कोरोना झाला सांगून चक्क शरीरातील अवयव विकले !

अजिंक्य नगरी
0

अहिल्यानगर मधील गंभीर घटनाविखे पाटील मेमोरिअल रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर यांच्यावर फसवणूक

  अहिल्यानगर : केवळ घशाच्या त्रासासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ८० वर्षाच्या वृद्धावर करोना झाल्याचे बनवट रिपोर्ट तयार करून केवळ पैसे उकळले. एवढेच नाही तर चुकीच्या उपचारांमुळे वृद्धाचा मृत्यू झाला. शिवाय अवयव तस्करीसाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा थरकाप उडवणारा प्रकार अहिल्यानगर मध्ये समोर आला आहे.

 


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर तोफखाना पोलीस स्टेशनला  ६ नामांकित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेने अहिल्यानगरच्या वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तक्रारदार अशोक खोकराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील बबनराव खोकराळे यांना १३ ऑगस्ट २०२० रोजी किरकोळ घशात खवखव आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

                        रुग्णालयातील डॉक्टरांनी खोटा आर टी पी सी आर रिपोर्ट तयार करून जबरदस्तीने कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर खोकराळे यांच्या कुटुंबियांना रुग्णाशी भेटण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली होती. १८ ऑगस्ट २०२० रोजी रुग्णालयाने साधारण 1 लाख ८० हजार रुपयांचं बिल भरल्यानंतरच रुग्णाच्या मृत्यूची माहिती दिली गेली. त्यानंतर मृतदेह मिळवण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेकडे संपर्क साधावाअसे कळविण्यात आले. मात्र आजतागायत मृतदेहाचा काहीच सुगावा लागलेला नाही. किवा मृतदेह ताब्यात दिलेला नाही.

 

 कटकारस्थान, फसवणूक अन मृत्यूस कारणीभूत

या प्रकरणी अहिल्यानगर मधील नामांकित रुग्णालयाचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ सचिन पांडुळे, डॉ अक्षयदीप झावरे, डॉ मुकुंद तांदळे तसंच विखे पाटील मेमोरिअल रुग्णालय लॅबचे तज्ञ डॉक्टर यांच्यावर कट कारस्थान करून फसवणूक केली आणि मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे गंभीर आरोप रुग्णांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहेत.



फिर्यादी खोकराळे म्हणाले.

खोकराळे  या रुग्णाला खाटाला बांधून ठेवले, धमकावले, जेवण न देता छळ केला. या शिवाय एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखवून बिलं वाढवण्यात आले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी, अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा व विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या वडिलांचा मृतदेह आजतागायत सापडलेला नाही. बनावट कोविड रिपोर्ट तयार करून हॉस्पिटलने पैसे उकळले. सर्व काळोखात लपवण्यात आले. अहिल्यानगर मध्ये आरोग्यसेवेचं नाही, तर थेट गुन्हेगारीचं रॅकेट आहे, हे आरोप खोकराळे त्यांनी केले आहेत.


Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default