लाखो बनावट बांधकाम कामगारांचा घोटाळा!”

अजिंक्य नगरी
0

 


राज्यात लाखो बनवट बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. या क्षेत्रातील दलालांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चक्क इतर ठिकाणी नोकरी करणारे, खाजगी जॉब करणारे, रोजगार हमीच्या कामावर जाणारे, एवढेच नव्हे तर ७५ टक्के अपंग,सहकारी कारखाने यांच्यात काम करणारे नोकरदार यांना देखील बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून दिलेली आहे. यातून अश्या बनावट बांधकाम कामगार व शासनाची मोठी आर्थिक फसवणूक या दलालांनी केलेली असून फसवणुकीची रक्कम हजारो कोटी रुपयांमध्ये आहे,

             महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस तथा वारसाला दोन लाख रुपये मिळतात. याच संधीचा फायदा घेऊन एका व्यक्तीने पत्नी मयत झाल्याचे तर चार महिलांनी पती मरण पावल्याची बनावट मृत्युपत्रे काढून मदतीसाठी अर्ज केले. त्यातील तिघींना पैसेही मिळाले, पण त्यांचे बिंग फुटले आणि त्या पाच जणांविरुद्ध सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारास संसारोपयोगी साहित्य मिळते, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी अर्थसाहाय्य, कामगारास अपंगत्व आल्यास आर्थिक मदत, नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना आर्थिक मदत, असे लाभ मिळतात. त्यामुळे अनेकांनी एजंटांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी केली आहे. त्यावर काही संघटनांनी आक्षेप घेत चौकशीची मागणी देखील केली आहे. मागील वर्षभरात बांधकाम कामगारांमध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचेही चित्र आहे. एजंटांना काही रक्कम दिल्यास बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यापासून सर्व लाभ मिळेपर्यंत सर्व कामे तेच करतात, अशी स्थिती आहे. त्यातूनच या पाच जणांनी बनावट मृत्यपत्रे देऊन फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

                महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या योजनांमध्ये बोगस कागपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करणार्‍या दलालांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे दलाल, एजंटांचे आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

               तालुक्य तालुक्यांमध्ये सध्या दलाला निर्माण झाले आहेत. ग्रामसेवक आणि सरपंच यांचे बनावट शिक्के या दलालांनी तयार करून घेतले आहेत. ठेकेदारांचे शिक्के लेटर हेड तयार करून  ९० दिवस काम केल्याचे बनावट कागदपत्र तयार करून लाखो बनावट बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. एवढेच नव्हे तर ७५ टक्के अपंगत्वाचे खोटे दाखले प्रमाणपत्र तयार करून या योजने अंतर्गत करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून उकळण्यात आलेले आहेत. आर्थिक लाभ उठविण्यासाठी खोटी मृत्यू प्रमाणपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्रे, 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याबाबतचे ठेकेदाराचे खोटे प्रमाणपत्र  30 ते 40 टक्के दिव्यांग असताना 75 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडून शासनच्या या योजनेत बांधकाम मंडळाकडील सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेऊन, मुलांना शिष्वृत्ती घेऊन फसवणूक केली आहे.

                        काही ठेकेदारांनी एकही ठिकाणी काम सुरु नसतांना काही रकमा घेऊन कामगारांना ९० दिवस काम केल्याचे बोगस प्रमाणपत्र दिले असून असे प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट राज्यात सक्रीय आहे.

                        महाराष्ट्र शासनाने बनावट कामगार तपासणीसाठी दक्षता पथक स्थापन केले आहे. पुढील काळात असे अनेक बनावट कामगारांचे बिंग फुटणार असून या लाखो बनावट बांधकाम कामगारांवर गुन्हे दाखल होणार असून शासनाकडून फसवणूक करून मिळविलेला प्रपंच देखील परत करावा लागणार आहे.

रिपोर्ट : कुणाल गायकवाड मो. ९०४९०६००४० 

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default