शेतकऱ्यांची दिवाळी कडू! दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकारने पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने

अजिंक्य नगरी
0

 

शेतकऱ्यांची दिवाळी कडू! दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकारने पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने

 

मुंबई : (अजिंक्य नगरी) राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत दिवाळी आधी देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र दिवाळीच्या पूर्व संध्येला एकही शेतकऱ्याला थेट मदत मिळालेली नाही.

                              
      भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी आहे. ते भांडवलदार धार्जिणी असल्याची चर्चा व आरोप नेहमी होत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिवाळी पूर्वी मिळेल अशी ग्वाही देऊन राज्यभर दिंडोरा पिटविला होता मात्र अद्याप पर्यंत कोणतीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

         आज दिवाळीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झालेली नाही. आणि उद्या म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बँका बंद असणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी कोरडीच जाणार असून शेतकरी विरोधी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली आहेत.

            ऐन दिवाळीत सामान्य शेतकरी. कष्टकरी वर्गाची शासनाने व फडणवीस यांनी फसवणूक केली आहे. शेतकरी राजा नुकसान झाल्याने मेटाकुटीला आलेला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. संपूर्ण कुटुंब ची कुटुंब या अस्मानी संकटाने उध्वस्त झाली आहेत. ऐन नुकसान झाले त्या वेळी नेते शेताच्या बांधावर आले. मदतीचे आश्वासन दिले. गोर-गरीबाची घरे पाण्यात गेली आणि श्रीमानांच्या भेटीला नेते आले अशी अवस्था होती. मात्र तरीही शेतकऱ्याने धीर सोडला नाही.

               सरकार मदत करेल या आशेने दिवाळीच्या आधीच्या दिवशी पर्यंत सामान्य शेतकरी आपल्या मोबाईलचा मेसेज बॉक्स तपासात होता कि किमान काहीतरी मिळेल मात्र केवळ निराशा पदरी पडली आहे. हि घोर फसवणूक शेतकरी वर्गाची सरकारने केली आहे. आता बँका बंद झाल्या आहेत जरी पैसे आले तरी त्याचा वापर दिवाळी साठी होणार नाही. म्हणजेच फडणवीस यांनी शेतकऱ्याची दिवाळी कडू केली आहे.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default