पुणे (अजिंक्य नगरी)
: नुकतेच
पुण्याच्या शनिवारवाड्यात काही मुस्लीम महिलांकडून सामूहिक नमाज
पठण
करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला
आहे. त्या विरोधात काल काही
संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. या प्रकरणात संबंधितांविरुद्ध गुन्हा
दाखल करण्याची मागणी समाजात जोर धरत होती. याप्रकरणी अज्ञात
महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली आहे. शनिवारवाड्यामध्ये काही
महिलांनी सामूहिक नमाज पठण केली. त्याचा व्हिडिओ रविवारी सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दोन
दिवसांपूर्वीचा आहे.
खरे
तर शनिवार वाडा हे शौर्याचे प्रतिक नाहीच. शनिवार वाडा आणि तेथील इतिहास सर्वाना
माहित आहे. बाजीराव पेशव्यांनी रखेल म्हणून ठेवलेले आणि विवाह केलेल्या मस्तानी
साठी बांधलेला आणि बाजीवर पेशव्याने मस्ती करण्यासाठी बांधलेला हा वाडा असल्याच्या
अनेक इतिहासिक पुरावे व चित्रपटांमध्ये आपण पाहिलेले आहे.
शनिवार वाडा आणि त्याचा इतिहास राज्याला आणि शहरातील एक ऐतिहासिक तटबंदी आहे, ज्याची उभारणी १७३० मध्ये सुरू झाली आणि १७३२ मध्ये पूर्ण करण्यात आली. पेशव्यांचे हे निवासस्थान
१८१८ पर्यंत राहिले १८२८ मध्ये एका मोठ्या आगीमुळे शनिवार वाड्याचे मोठे नुकसान झाले. पण उरलेल्या भागांचे आता
पर्यटन स्थळ म्हणून जतन शासनाकडून केले जाते.
शनिवार वाड्यात रंगत असत बाजीराव
– मस्तानीच्या रासलीला
जर तुम्ही काही प्रमुख मराठी चित्रपट आधीच पाहिले असेल, तर ही प्रेमकथा तुमच्यासाठी नवीन होऊ शकत नाही. ज्या दर्शकांना बॉलीवूड चित्रपटाची माहिती नाही त्यांच्यासाठी,अश्या वाचकांसाठी ही कहाणी बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल यांनी मुघलांच्या
हल्ल्याविरुद्ध मदतीसाठी बाजीराव पेशवा प्रथम यांना केलेल्या विनंतीने सुरू झाली होती. बाजीरावने लढाईत उभे राहून मुघल सैन्याचा सेनापती मुहम्मद खान याचा पराभव
केला होता. म्हणून महाराजा
छत्रसाल त्यांची मुलगी मस्तानी आणि त्यांच्या राज्याचा एक तृतीयांश भाग
त्यांच्याशी लग्नात बाजीराव पेशवा यास दिला.
सुंदर
मस्तानीच्या प्रेमात बाजीराव पडले आणि हिंदू पेशव्यांनी धार्मिक मतभेद असूनही मुस्लिम मस्तानीला आपली दुसरी पत्नी म्हणून शनिवार वाड्यात आणले. हा सर्व प्रकार बाजीरावच्या आईला आणि शनिवार वाड्यातील इतर वडीलधाऱ्या मंडळींना मान्य नहुता. त्यांनी तिचे जीवन थोडे कठीण केले होते शेवटी बाजीरावांना तिला शनिवार वाड्यातून बाहेर
काढून मस्तानी महाल नामक तिच्या स्वतःच्या राजवाड्यात ठेवावे लागले. युद्धानंतर बाजीरावपेशवा यांचा मृत्यू झाला आणि काही महिन्यांतच मस्तानीनेही प्राण त्यागले. तिचा मृत्यू अजूनही वादग्रस्त ठरत आहे. काही अभ्यासक म्हणतात की ती आत्महत्या होती तर काहींचे म्हणणे आहे की ती बाजीराव पेशव्याच्या मृत्यूची घटना सहन करू शकली नाही. आणि ती मरण पावली.